नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण गृह विभागात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. ‘तमिळनाडू युनिफॉर्म्ड स्टाफ रिक्रूटमेंट बोर्ड’ (TNUSRB) ने 3359 कॉन्स्टेबल, जेल वॉर्डन आणि फायरमनच्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर आहे. इच्छुक उमेदवार TNUSRB च्या अधिकृत वेबसाइट tnusrb.tn.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. TNUSRB Bharti अंतर्गत एकूण 3359 पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण पदांची संख्या किती?
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3359 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 2576 पुरुष उमेदवारांसाठी आणि 783 महिला उमेदवारांसाठी आहेत.
आवश्यक वयोमर्यादा काय?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 250 रुपये भरावे लागतील.
इथे करा अर्ज…
TNUSRB च्या अधिकृत वेबसाइट tnusrb.tn.gov.in ला भेट द्या. या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करता येऊ शकणार आहे.