नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांचा शोध आता संपणार आहे. कारण पटना उच्च न्यायालयात रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पटना उच्च न्यायालयात पर्सनल असिस्टंटच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी 28 ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती पर्सनल असिस्टंटच्या पदांसाठी केली जाणार आहे. एकूण पदांची संख्या 36 आहे. लेव्हल 7 अंतर्गत, वेतनमान 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना असेल.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट patnahighcourt.gov.in वर अर्ज करू शकतात.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे.
– फी भरण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
वयोमर्यादा काय असेल?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 37 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज फी किती?
अनारक्षित / BC/ EBC/ EWS श्रेणीतील अर्जदारांना 1100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/OH श्रेणीसाठी 550 रुपये लागू होतील.
कशी असेल निवड प्रक्रिया?
अर्जदारांना प्राथमिक परीक्षा, मुख्य शॉर्टहँड संगणक टायपिंग चाचणी आणि मुलाखत फेरीच्या आधारे निवडले जाईल. अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांना येथे अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकेल.