पुणे, ता.११ : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता सोलापूर जिल्हा रुग्णालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. ही भरती वैद्यकीय अधिकारी पदासाठी असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
सोलापूर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या जागेसाठी 10 पदे भरली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर या ठिकाणी जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करणारा उमेदवार 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करू शकणार आहे.
– अर्ज कुठं पाठवायचा?
अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. ही प्रक्रिया ऑफलाईन असल्याने अर्ज 13 ऑक्टोबरपर्यंत पोहोचतील असे पाहावे.
– निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरती प्रक्रियेंतर्गत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
– मुलाखतीची तारीख काय?
17 ऑक्टोबर 2023 ही मुलाखतीची तारीख असणार आहे.
– मुलाखत कुठं होणार?
या पदांसाठी मुलाखत ही 17 ऑक्टोबरला होणार असून, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर येथे मुलाखत घेतली जाणार आहे.
अधिक माहिती कुठं मिळेल?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती https://solapur.gov.in/ वरून घेता येऊ शकणार आहे.