नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूण-तरूणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण भारतीय टपाल खाते अर्थात इंडियन पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला केवळ 100 रुपये अर्ज शुल्क भरून दरमहा 20 हजार रुपयांचा पगार मिळू शकतो.
भारतीय टपाल खात्याच्या मध्य प्रदेश विभागात 1565 पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 623 पदे आरक्षित आहेत. तर OBC साठी 185 पदे, SC साठी 255 पदे, ST साठी 308 पदे, उर्वरित जागा इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अशी असेल भरती प्रक्रिया…
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय?
– 23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
अर्जासाठी आवश्यक पात्रता काय?
भारतीय टपाल खात्यात अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. यासोबतच उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराला स्थानिक बोलीभाषेवर चांगले प्रभुत्व असावे.
अर्ज फी आणि पगार किती?
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना 5200 ते 20200 रुपये पगार मिळू शकतो.