Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : नायब तहसीलदाराची ‘डिमांड’ पूर्ण करा ; थकीत कर्जापोटी तारण असलेल्या मालमत्तेवरील जप्ती टाळा; जप्तीपासून मुक्तीसाठी नायब तहसीदार कडून लाखोंची वसुली सुरु…!

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Friday, 18 August 2023, 19:57

लोणी काळभोर (पुणे) : बॅंका व विविध फायनान्स कंपन्यांच्या थकीत कर्जापोटी मालमत्तेचा ताबा अथवा जप्ती टाळण्यासाठी पुणे शहरालगतच्या एका ‘सधन’ तालुक्यातील नायब तहसीलदार कर्जदारांकडून ५० हजारांपासून ते दीड-दोन लाखांपर्यंतच्या रकमेची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

बॅंका व विविध फायनान्स कंपन्यांच्या कर्जदारांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी त्यांच्याकडे तारण असलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीसाठी शासकीय नियमाप्रमाणे नायब तहसीलदारांकडे दावा दाखल करतात. बॅंकांनी दावा दाखल करताच, पुणे शहरालगतच्या एका ‘सधन’ तालुक्यातील नायब तहसीलदार मात्र त्यासंदर्भातील सुनावणी सुरु करण्यापूर्वी कर्जदारांच्या मालमत्तेचा ‘ताबा अथवा जप्ती’ टाळण्यासाठी कर्जदारांकडे पैशाची मागणी करत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लालसेपोटी पदाचा दुरूपयोग

विविध फायनान्स कंपन्या, वित्तीय संस्था तसेच अनेक बँकांकडून कर्जपुरवठा केला जातो. त्याकामी कर्जदारांच्या विविध मालमत्ता तारण ठेवल्या जातात. सिक्युरीटायझेशन अँड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड इंन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १४ अंतर्गत तारण मिळकतीचा ताबा घेण्याबाबतची प्रक्रिया आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बहुतांश प्रकरणांमध्ये तालुक्यातील निवासी नायब तहसीलदारांना प्राधिकृत अधिकारी केले जात असते. याचाच आर्थिक फायदा संबंधित निवासी नायब तहसीलदार उचलत असल्याचे दिसून येत आहे.

महसूल विभागाविषयी तीव्र नाराजी

दरम्यान, बॅंकेकडून घेतलेल्या मूळ कर्जाची रक्कम, त्यावरील थकीत व्याज, चक्रवाढ व्याज, हाताळणी खर्च, प्रवास खर्च, नोटीस खर्च अशा विविध ज्ञात-अज्ञात हेडच्या आर्थिक बोजाखाली अगोदरच अडकलेल्या कर्जदाराला कर्जापोटी तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या जप्तीच्या नोटीशीची भिती दाखवून, एका निवासी नायब तहसीलदाराने कर्जदारांच्या टाळूवरचे लोणी खाण्यास सुरुवात केल्याने एकूणच महसूल विभागाविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

 

कारवाई टाळण्यासाठी ‘अनोखी’ वसुली

कोरोना महामारीमुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अनेकांचे व्यवसाय मंदावले असून, कित्येकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेकांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड झाली नसल्याने थकीत हप्त्यांमुळे कर्जाचा फुगवटा वाढत चालला आहे. याच आर्थिक ताणतणावातून व विविध वित्तीय संस्था व फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्याच्या तगाद्याला वैतागून काही तरुणांनी व व्यावसायिकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अशी परिस्थिती असतानाही शहरालगतच्या एका वजनदार तालुक्यात प्राधिकृत केलेल्या निवासी नायब तहसीलदाराने जप्ती व ताबा घेण्याबाबतची कार्यवाही टाळण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करुन अनोखी वसुली चालू केली आहे.

तहसीलदाराची ‘डिमांड’ पूर्ण न केल्यास कारवाई

नायब तहसीलदाराच्या मागणीनुसार ज्या कर्जदारांकडून वैयक्तिक आर्थिक वसुली होते, त्यांचा ताबा व जप्ती टाळली जाते. मात्र, काही कर्जदार जे नायब तहसीलदाराची कथित ‘डिमांड’ पूर्ण करत नाहीत त्यांना मात्र कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे. यामुळे विविध वित्तीय संस्था, बॅंका, पतसंस्थांच्या थकीत कर्जापोटी कर्जदारांच्या मालमत्तेचा ताबा अथवा जप्त करण्याबाबतची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कर्जापोटी अगोदरच मरणाच्या दारात पोचलेल्या कर्जदारांकडे जप्ती टाळण्यासाठी पैशाची मागणी करणे ही बाब कर्जदाराला मरणाच्या खाईत ढकलण्याचा प्रकार‌ आहे. या कर्जदारांची सखोल चौकशी करुन, संबधितावर कायदेशीर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘बड्या’ अधिकाऱ्यालाही त्यांनी कोलले….

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ‘बड्या’ अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचे एका वित्तीय संस्थेकडून घेतलेले कर्ज प्रकरण थकीत झाले होते. थकीत कर्जापोटी तारण असलेल्या मालमत्ता जप्तीची नोटीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाला मिळताच, संबंधित बड्या अधिकाऱ्याने नायब तहसीलदारांची भेट घेऊन नातेवाईकांसाठी मदतीची याचना केली. थकलेले कर्ज महिनाभरात भरण्याची तयारी दाखवत, काही काळ कारवाई थांबवण्याची विनंती केली. मात्र, लाचरुपी पैशांची चटक लागलेल्या नायब तहसिलदाराने कार्यवाही टाळण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयातील या ‘बड्या’ अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाकडेही लाखोंचा मलिदा मागितला. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याला समजल्यावर त्यांनी कथित नायब तहसीलदारांची चांगलीच कानउघाडणी केली. तरीदेखील त्याने लाखोंचा आकडा कमी करुन, ताबा घेण्याचा इरादा स्पष्ट केल्याने, संबंधित निवासी नायब तहसीलदाराला कोण लगाम घालणार, याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

सुवर्णसंधी ! फक्त 100 रुपये अर्ज शुल्क भरून मिळू शकते 20 हजारांची नोकरी ; तेही सरकारी विभागात, जाणून घ्या भरती प्रक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp