Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

११ बोगदे, १७ मोठे पूल आणि ९ जंक्शन! पुण्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या भव्य रिंग रोडचे वेगात; महापालिकेच्या हद्दीत भूसंपादनाला गती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 November 2026, 17:01

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजित अंतर्गत वर्तुळाकार मार्गाच्या कामाला आता वेग येण्याची शक्यता आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या मार्गाचा आराखडा तयार करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर आता पुणे महापालिकेनेही आपल्या हद्दीतील मार्गाच्या नियोजनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा आणि अभियांत्रिकी आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

या वर्तुळाकार मार्गामुळे पुण्याची नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि सातारा या शहरांशी जोडणी अधिक वेगवान होणार आहे. तसेच शहरातून जाणाऱ्या बाहेरील वाहनांची संख्या कमी होऊन अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

पुणे परिसरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. हा मार्ग एकूण ८३.१२ किलोमीटर लांबीचा आणि ६५ मीटर रुंदीचा असणार आहे. तो पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांनी आपापल्या हद्दीतील मार्गाचे नियोजन, भूसंपादन आणि उभारणी करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पीएमआरडीएने यापूर्वीच मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. आता महापालिकेकडूनही पुढील नियोजनाला सुरुवात झाली आहे.

महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदापूर्व सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सल्लागारामार्फत संपूर्ण मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण, वाहतूक अभ्यास, रस्त्यांचे नियोजन आणि उन्नत मार्गाची रचना यांसारखी कामे केली जाणार आहेत.

हा मार्ग पुणे परिसरातील सध्या अस्तित्वात असलेल्या आणि भविष्यात प्रस्तावित असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जाणार आहे. यामध्ये महामेट्रो, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांसारख्या यंत्रणांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे वर्तुळाकार मार्गाची आखणी करताना भविष्यातील या प्रकल्पांना अडथळा निर्माण होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

सध्या पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या अनेक वाहनांना शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतो. अंतर्गत वर्तुळाकार मार्ग तयार झाल्यानंतर शहर परिसरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई-हैदराबाद आणि बंगळुरू-मुंबई महामार्गासह नाशिक, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागात न येता बाहेरून वळवता येणार आहे.

यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ वाचण्याची आणि वाहनांचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे.

अंतर्गत वर्तुळाकार मार्गाची वैशिष्ट्ये

– एकूण लांबी : ८३.१२ किलोमीटर
– रुंदी : ६५ मीटर
– रेल्वे उड्डाणपूल : २
– बोगदे : ११
– मोठे पूल : १७
– जंक्शन : ९

सात टप्प्यांत मार्गाची उभारणी

१. सोलू ते वडगाव शिंदे – ४.७० किलोमीटर

२. नगर रस्ता ते सोलापूर रस्ता – १२.२९ किलोमीटर

३. सोलापूर रस्ता ते सासवड रस्ता – ६.१४ किलोमीटर

४. सासवड रस्ता ते सातारा रस्ता – १४.५७ किलोमीटर

५. सातारा रस्ता ते पौड रस्ता – १२.४० किलोमीटर

६. पौड रस्ता ते म्हाळुंगे-नांदे रस्ता – १०.५५ किलोमीटर

७. म्हाळुंगे-नांदे रस्ता ते परांदवाडी – १६.७७ किलोमीटर

अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीतील या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादनाला गती देऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर यांनी दिली.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बाळूमामा मंदिराचा 60 कोटींचा हिशेब संशयाच्या भोवऱ्यात!आयुक्त निवेदिता पवार चौकशीच्या कचाट्यात..

Thursday, 19 November 2026, 17:54

तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात इंदापुरात बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा! भाजपसह सर्वपक्षीय नेते एकवटले

Thursday, 19 November 2026, 17:47

प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी बसचालकांना पुणे आरटीओचा मोठा दणका! व्हॉट्सॲपवरील तक्रारीनंतर २० चालकांना नोटिसा, तर २३ जणांवर थेट कारवाई!

Thursday, 19 November 2026, 17:44

उरुळी कांचनमध्ये विधी सेवा शिबिर संपन्न ; ग्रामस्थांना कायदेशीर हक्क आणि अधिकारांचे मार्गदर्शन

Thursday, 19 November 2026, 17:14

पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड! उड्डाणापूर्वीच तांत्रिक अडचण, सुरक्षायंत्रणेची धावपळ.

Thursday, 19 November 2026, 17:08

११ बोगदे, १७ मोठे पूल आणि ९ जंक्शन! पुण्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या भव्य रिंग रोडचे वेगात; महापालिकेच्या हद्दीत भूसंपादनाला गती

Thursday, 19 November 2026, 17:01
Next Post

पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड! उड्डाणापूर्वीच तांत्रिक अडचण, सुरक्षायंत्रणेची धावपळ.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp