Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी बसचालकांना पुणे आरटीओचा मोठा दणका! व्हॉट्सॲपवरील तक्रारीनंतर २० चालकांना नोटिसा, तर २३ जणांवर थेट कारवाई!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 November 2026, 17:44

पुणे : दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन खासगी बसचालकांकडून मनमानी पद्धतीने तिकीटदर वाढवले जात असल्याचे समोर आले आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारल्याच्या तब्बल ४३ तक्रारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आरटीओने २० खासगी बसचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच विशेष तपासणी मोहिमेत २३ बसचालक प्रवाशांकडून जादा भाडे घेत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक गावी जाण्यासाठी खासगी बसचा पर्याय निवडतात. प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन काही खासगी बसचालकांकडून नियमांचे उल्लंघन करत जादा भाडे आकारले जाते. याला आळा घालण्यासाठी आरटीओने यंदा खासगी बसचालकांची बैठक घेतली होती. या बैठकीत नियमांपेक्षा जास्त भाडे आकारू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच जादा भाडे आकारल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता.

प्रवाशांना अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी आरटीओने व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत ४३ नागरिकांनी जादा तिकीटदर आकारल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने आरटीओने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत २० बसचालकांना नोटिसा बजावून त्यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींमधील बसचालकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यांनाही नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.

जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी आरटीओने १ नोव्हेंबरपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ३८९ खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७४ वाहने विविध नियमांचे उल्लंघन करताना आढळली. यातील २३ बसमधून प्रवाशांकडून नियमापेक्षा जास्त भाडे घेतले जात असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. खासगी बसचालकांकडून जादा भाडे आकारणी होत असल्याच्या प्रकरणांत यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत आरटीओने ९२९ खासगी वाहनांची तपासणी केली होती. त्यामध्ये ३१५ वाहने विविध नियमांचे उल्लंघन करताना आढळली होती. मात्र, यापैकी केवळ सात वाहनांकडूनच प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. या दोन महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांकडून एकूण २५ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

याबाबत पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले म्हणाले, “बसचालकांना नियमांपेक्षा जास्त तिकीटदर आकारू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. जादा तिकीट आकारणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी जाहीर केलेल्या क्रमांकावर आतापर्यंत ४३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींशी संबंधित चालकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे.”

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात इंदापुरात बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा! भाजपसह सर्वपक्षीय नेते एकवटले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp