नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. तटरक्षक दलात खलाशीच्या 350 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी 8 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
खलाशी या पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.cdac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तटरक्षक दलात नाविक पदावर भरतीसाठी उमेदवार दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 22 वर्षे दरम्यान असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट मिळेल.
कोणत्या पदांवर जागा भरणार?
नेव्हिगेटर जीडी – 260, नाविक डोमेस्टिक – 30, यांत्रिकी – 25, यांत्रिकी विद्युत – 20, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स – 15
किती असेल अर्ज शुल्क?
भारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी अर्ज शुल्क 300 रुपये असणार आहे. अर्ज शुल्काचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
किती मिळू शकतो पगार?
नाविक देशांतर्गत शाखा आणि जीडी – रुपये 21,700/- दरमहा आणि विविध भत्ते. यांत्रिक – 29,200 रुपये आणि विविध भत्ते.