Job : आपल्याला चांगली नोकरी मिळाली अशी अनेकांची इच्छा असते. पण नोकरी मिळण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे इंटरव्ह्यू अर्थात मुलाखत. याच मुलाखतीला जाताना काय करावं अन् काय नको, कोणता ड्रेस घालावा असाही प्रश्न अनेकांना पडतो. याबाबतच आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत.
नोकरीसाठी मुलाखत देताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे तुमची ‘बॉडी लँग्वेज’ अर्थात तुमची देहबोली. पण, हे कौशल्य फक्त प्रोफेशनलदृष्ट्याच महत्त्वाचे नसून वैयक्तिक जीवनातही फायद्याचे ठरते. त्यामुळे तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पारख होते. सामान्यतः असे मानले जाते की, इतर लोक बोलत असताना आपण त्यांच्या नजरेला नजर मिळवून ते ऐकले पाहिजे. असे केल्यास आपला आत्मविश्वास कितपत आहे हेदेखील यामधून समजते, असे मानले जाते.
याशिवाय, मुलाखतीच्या वेळी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक दिले पाहिजे. उत्तर देताना गडबडून जाऊ नका. अथवा घाबरून चुकीचे उत्तर देऊ नका. मुलाखतीस जाताना तुमचे शिक्षण, तुम्हाला असलेला अनुभव व तुम्हाला कामातील असलेली आवड याची माहिती अगोदरच लक्षात घ्या. तुमची मुलाखत जो कोणी घेणार आहे, त्याचे निदान नाव लक्षात ठेवा. मुलाखतीला जाताना कॅज्युअर, फॅन्सी कपडे घालणे टाळा. फॉर्मल कपड्यांना प्राधान्य द्या. या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास फायद्याचे ठरू शकते.