Employment News : पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांवर भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून, या अंतर्गत 2109 रिक्ते पदे भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क) या पदांसह इतर अनेक पदे भरली जात आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– विभागाचे नाव : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
– पदाचे नाव : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), (Employment News ) लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ
– एकूण पद संख्या : 2109
– शैक्षणिक पात्रता काय असावी?
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित) : दहावी परीक्षा उत्तीर्ण / तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट- ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण / विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका.
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट- ब अराजपत्रित): दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण / वास्तुशास्त्राची पदवी.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) : दहावी परीक्षा उत्तीर्ण / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) (Employment News ) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा अर्हता धारण केलेली असावी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर, 2023
– अधिकृत वेबसाईट : या भरती प्रक्रियेंतर्गत अधिक माहितीसाठी https://pwd.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Employment News : UPSC मध्ये निघाली मोठी भरती; अनेक पदे भरली जाणार, आजच करा अर्ज…