पुणे : शिक्षण संपलं की नोकरीचा शोध सुरू होतो. त्यासाठी कुठं अर्ज करावा, कुठं नोकरी मिळेल याचा शोध सुरु होतो. पण त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे वैद्यकीय अधिकारी , परिचारिका, कार्यशाळा प्रशिक्षक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, ग्रंथालय परिचर, चालक, लेखापाल, वसतिगृह लिपिक, वसतिगृह वॉर्डन, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि लिपिक-सह-टंकलेखक यांसह इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 304 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://dbatu.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.
जाणून घ्या भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, वरिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, ड्राफ्ट्समन, ड्राफ्ट्समन प्रशिक्षणार्थी, सॉफ्टवेअर अभियंता, क्रीडा संचालक, क्रीडा प्रशिक्षक/प्रशिक्षक यांसह इतर अनेक.
– एकूण रिक्त पदे : 304 पदे.
– नोकरीचे ठिकाण : रायगड.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000 ते 40,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 5, 6, 7, 8, 9, 10 ऑगस्ट 2024.
– मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. 402 103