Railway Recruitment 2023 : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. मध्य रेल्वेत कनिष्ठ अभियंता, लोको पायलट आणि गार्ड/ट्रेन व्यवस्थापक यांसह 1303 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट rrccr.com वर जाऊन अर्ज करावा.(Railway Recruitment 2023)
पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
रेल्वेत ही भरती GDCE कोट्याअंतर्गत केली जात आहे. यासाठी उमेदवार 1 ऑगस्ट 2023 रोजी मध्य रेल्वेचे नियमित कर्मचारी असावेत आणि त्यांची नियुक्ती 1 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी रेल्वेमध्ये झाली पाहिजे. ज्या उमेदवारांनी राजीनामा दिला आहे किंवा मध्य रेल्वेवरून इतर कोणत्याही रेल्वेमध्ये बदली झाली आहे, त्यांना पॅनेलमेंटसाठी विचारात घेतले जाणार नाही.(Railway Recruitment 2023)
कोणत्या पदांवर होणार भरती?
असिस्टंट लोको पायलट – 732
तंत्रज्ञ – 255
कनिष्ठ अभियंता – 234
गार्ड/ट्रेन मॅनेजर – 82
शैक्षणिक पात्रता काय ?
ALP- NCVT/SCVT ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक/SSLC अधिक ITI किंवा ITI च्या बदल्यात मान्यताप्राप्त संस्थेतून या अभियांत्रिकी शाखेच्या विविध प्रवाहांमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.
तंत्रज्ञ – मॅट्रिक/एसएसएलसी आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थांकडून ITI प्रमाणपत्र.(Railway Recruitment 2023)
वयोमर्यादा काय?
यूआर – 42 वर्षे , ओबीसी – 45 वर्षे तर एससी/एसटी – 47 वर्षे
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट rrccr.com वरून माहिती मिळू शकते.(Railway Recruitment 2023)