Big News मुंबई : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. (Big News) नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. (Big News)
शिक्षक भरतीविषयी माहिती देताना दीपक केसरकर म्हणले की, ‘राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही. राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप यावरही प्रतिक्रिया दिली आहे.
गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, केसरकर यांच्या सूचना
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनाही यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.