पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर येथे कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. त्यासाठी ग्रॅज्युएट अर्थात पदवीधर असणं गरजेचे आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संगणक ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 1 पद.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 31 जुलै 2024.
– मुलाखतीचा पत्ता : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंदपेठ, नागपूर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sjsa.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.