राशीभविष्य : आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा आहे?कोणत्या संधी तुम्हाला आज मिळणार? तुम्ही आज काय टाळायला हवं? तर चला तर मग आजच तुमचं राशीभविष्य जाणून घेऊ. सध्या शनी आपली मूळ रास कुंभ राशीत आहे. या राशीत शनी 2025 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी याच राशीत मार्च 2025 पर्यंत असणार आहे. 30 जून रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. तर, या स्थितीमध्ये तो 15 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. शनीच्या वक्री अवस्थेमुळे काही राशीच्या लोकांवर याचा परिणाम होणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत.
१) धनु रास
आज धनु राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल हि खूप लाभदायक असणार आहे. अनेक दिवसांपासून राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. त्यासोबतच तुमची आर्थिक स्थितीदेखील बळकट होण्याची शक्यता आहे. तुमचं मन प्रसन्न असेल . परिवारासोबत तुमचा वेळ अगदी चांगला जाईल. तुमच्या नोकरीत पदोन्नतीसह पगारवाढीचेही लक्षण आहे.
२) कर्क
सध्या कर्क राशीमध्ये शनी आठव्या चरणात आहे. या राशीच्या सातव्या आणि आठव्या चरणाचा स्वामी शनी आहे. त्यामुळे शनीच्या वक्री चालीचा या राशीच्या लोकांवर खूपच शुभ परिणाम होणार आहे. कर्क राशीच्या लोकांना कधी विचार न केलेल्या लाभाची संधी मिळेल. तसेच, तुमच्या संपत्तीसोबतच धनात वाढ होईल. नोकरीच्या बाबतीत अनेक संधी तुमच्या हातून सुटतील. पण नाराज होऊ नका, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल.
३)मकर
मकर राशीच्या दुसऱ्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल अत्यंत फायदेशीर असणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ होणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना आवडती चांगली नोकरी मिलेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे.