Horoscope Today 3 January 2026: आज 3 जानेवारी 2026 नववर्षाचा पहिला शनिवार असल्याने हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे आज एक विशेष आणि दुर्लभ संयोग तयार होत असून त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. शनिदेवांच्या कृपेने काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो, तर काहींना संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनावर आजच्या ग्रहस्थितीचा प्रभाव जाणवेल. तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल, कोणाला यश मिळेल आणि कोणाला अडचणींचा सामना करावा लागेल, हे जाणून घेण्यासाठी आजचे 12 राशींचे राशीभविष्य पाहूया.

मेष : आज मेष राशीच्या लोकांचा उत्साही आणि आनंदी स्वभाव सर्वांनाच जाणवेल. तुमच्या सहवासात येणारे लोक सकारात्मक ऊर्जा अनुभवतील. घरामध्ये तुमचा शिस्तप्रिय आणि चोखंदळ स्वभाव दिसून येईल. कुटुंबातील कामे नीट मार्गी लागतील.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कलागुण दाखवण्याचा आहे. तुमचा कलात्मक पिंड इतरांना जाणवेल. कला, छंद किंवा सर्जनशील कामातून नाव आणि प्रशंसा मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि मन प्रसन्न राहील.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी आज घराच्या सजावटीकडे किंवा सौंदर्याशी संबंधित गोष्टींकडे लक्ष द्याल. तुमची आवड सर्वांना आवडेल. डोळ्यांशी संबंधित त्रास जाणवत असल्यास वेळेत उपचार घ्यावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी आज व्यवसायाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. कापड व्यवसाय, टेलरिंग, वाद्य वादन किंवा कला क्षेत्राशी संबंधित कामे चांगली चालतील. नवीन ऑर्डर किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांमध्ये आज विशेषतः महिलांचे बौद्धिक कौशल्य दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि सहकार्य इतरांना उपयोगी ठरेल. टीमवर्कमुळे यश मिळेल.
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी आज इतरांची कामे जास्त करण्याची शक्यता आहे. मात्र त्याची योग्य दखल न घेतली गेल्यामुळे मनात नाराजी राहू शकते. स्वतःच्या कामालाही महत्त्व द्या.
तूळ : तूळ राशीच्या लोकांचा आज व्यवहारात जबाबदारपणा दिसेल. मात्र स्पष्ट बोलण्यामुळे काही लोक दुखावले जाऊ शकतात. बोलताना थोडा संयम ठेवा.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना आज हुशारी आणि कल्पकतेमुळे यश मिळेल. मात्र थोड्या विसरभोळेपणामुळे कामात विलंब होऊ शकतो. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
धनु : धनु राशीच्या लोकांनी आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लेखक किंवा लिखाणाशी संबंधित लोकांनी शब्दांचा वापर जपून करावा.
मकर : मकर राशीच्या लोकांनी आज फसवणुकीपासून सावध राहावे. मेहनतीला अपेक्षित मान मिळत नसल्याची भावना येऊ शकते. संयम ठेवा.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांची सरकारी कामे आज मार्गी लागतील. नोकरी किंवा व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य मिळवण्यासाठी योग्य पावले उचलावी लागतील.
मीन : मीन राशीच्या लोकांचा दिलदार स्वभाव आज सर्वांना भावेल. घरात सुख, शांती आणि समाधानाचे वातावरण राहील. मन आनंदी राहील.






