आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की ते वाढत्या वजनाने त्रस्त असतील. त्यामुळे वजन कमी करण्याला प्राधान्य देत असतील तर काही लोक असेही असतील ते वजन वाढवण्यावर लक्ष देत असतील. पण तुम्हाला तुमचे वय आणि उंचीनुसार किती वजन असले पाहिजे हे जर माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.
वाढत्या मुलांचे वजन त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. जर एका महिन्याच्या बाळाची उंची 53 सेमी असेल तर त्याचे आदर्श वजन 4.35 किलो असावे. त्याचप्रमाणे, 3 महिन्यांच्या मुलाची उंची 60 सेमी असल्यास, त्याचे वजन 6 किलो आहे हे निरोगी मानले जाते. त्यात जर तुमची उंची 5’4 ते 6’0 पर्यंत असेल आणि मध्यम शरीर रचना असेल तर तुमचे वजन 50 ते 73 किलो असावे.
तसेच पुरुषांची उंची 5.0 असेल तर त्यांचं वजन हे 43-53 किलोपर्यंत असावे. 5.2 उंची असेल तर वजन 48-58 दरम्यान असणे गरजेचे आहे. जर उंची 5.4 असेल तर वजन 53-64 असणे आवश्यक आहे. याशिवाय, जर तुमची उंची 5.6 असेल तर वजन 58-70 असावे. 5.8 उंची असेल तर 63-76 वजन असायला हवे तर 6.0 उंची असल्यास तुमचं वजन 72-88 असावे.