सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे शरीरात थंडावा कसा निर्माण होईल याकडे लक्ष दिले जाते. त्यात कोल्ड्रिंक, ज्यूस पिण्याला प्राधान्य दिलं जातं. असे असताना आपल्यापैकी अनेकजण सब्जाच्या बिया देखील वापरत असतील. या बिया खरंच फायदेशीर अशा ठरतात. कारण, यातून प्रतिकारशक्ती वाढवतेच शिवाय पोट थंडही ठेवते. यासह इतर अनेक फायदे आहेत.
सब्जाच्या बियांच्या वापराने मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. सब्जाच्या बिया वापरल्याने साखर नियंत्रित राहते. तुम्ही दिवसांतून एकदा दुधात किंवा पाण्यात भिजवलेल्या बिया वापरू शकता. यामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश राहते. ते लावण्यासाठी खोबरेल तेलात बियांची पावडर मिसळा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. हे आठवड्यातून दोनदा करा. तुमचा चेहरा फुलून येईल. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. हे एक कप दुधासोबत सेवन करता येते. यामुळे पोटात जळजळ, अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होणार नाही.
तसेच सब्जाच्या बियांच्या वापराने मनाला देखील शांत वाटू शकते. याचे सेवन केल्याने मूड सुधारतो. मायग्रेन, थकवा, तणाव आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. याशिवाय, महिसांसाठीही गुणकारी ठरते. ते केसांची वाढ सुधारते. यामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. याच्या वापराने केस मजबूत आणि चमकदार होतात. याशिवाय केसांची वाढही वाढते. असे जरी असले तरी याचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.