उरुळी कांचन, (पुणे) : कस्तुरी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन कस्तुरी ग्रुपच्या वतीने मोफत रक्तदान शिबीर, नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, भव्य डिजिटल निबंध स्पर्धा, डिजिटल वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरात १०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच मागील पंधरा दिवसांपासून कस्तुरी प्रतिष्ठानने राबविलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरामध्ये २६९ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८ लोकांची शस्त्रक्रिया गुरुवारी (ता. २४) एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (महम्मदवाडी) येथे करण्यात येणार असल्याची माहिती कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी दिली.
यावेळी राबविण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम संस्कृती महादेव रेवडकर, द्वितीय उत्कर्ष मिलिंद मेमाणे यांनी पटकाविला. यावेळी रोख रकमेसह प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच निबंध स्पर्धेत प्रथम दिपाली उमेश कुंभार, द्वितीय ऋतिका मिलिंद मेमाणे, व सोनम विशाल परदेशी यांनी बक्षीसपत्र मिळविले.
दरम्यान, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (महम्मदवाडी), ब्लड बँक आणि स्पर्धांसाठी पर्यवेक्षक सदस्यांचे योगदान लाभले. सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे आभार कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने मिलिंद मेमाणे यांनी मानले.