वाढतं वजन हे चिंतेचं कारण ठरू शकतं. त्यामुळे हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी धावणे, चालणे, व्यायाम करणे इतकेच नाहीतर काहीजण औषधांचा वापरही करतात. मात्र, अशा काही गोष्टी आहेत त्याचा अवलंब केल्यास तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बदाम आणि आक्रोडचा आहारात समावेश करावा. बदाम आणि आक्रोडच्या सेवनाने शरीराला ताकद आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. त्यामुळे अतिरिक्त खाण्याला आळा बसू शकतं. परिणामी, हे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरू शकते. याशिवाय, कोथिंबीरचे पाणी पचनक्रिया सुधारते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करते. कोणतीही फळे सकाळीच खा. यासोबत तुम्ही भोपळा आणि सूर्यफुलाच्या बियादेखील खाऊ शकता. फळांमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक घटक आढळतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि शरीराला शक्तीही मिळते.
तसेच आहारात जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये फळे, भाज्या, धान्य आणि वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य यांचा आहार घ्यावा. यात असलेल्या फायबरमुळे तुम्हाला पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते आणि पचनास मदत होते. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त खाण्यापासून दूर राहता येतं.
बडीशेप किंवा दालचिनीचा चहा घ्या
आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास वजन कमी करण्यात फायद्याचे ठरू शकते. रात्रीच्या जेवणात हिरवी चटणी व्हेज खिचडीसोबत खावी. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप किंवा दालचिनी घालून चहा करून प्यायल्यास त्याचेही फायदे आहेत. या सर्व गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवायला सुरुवात होऊ शकते.
Dr Sushil Deshmukh
Consultant General Laparoscopic and Bariatric surgeon VishwaRaj Hospital