लोणी काळभोर (पुणे) : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील एका गरीब कुटुंबातील ओली बाळंतीण, तिच्या वजण कमी असलेल्या बाळावर गरजेच्या वेळी वैदकीय उपचाराबाबत कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुण्यातील ससुन रुग्णालयाकडुन पंधरा दिवसापुर्वी मोठ्या प्रमानात हेळसांड झाली होती. गरजेच्या वेळी उपचार न मिळाल्याने, तब्बेत खालावलेल्या बाळाची मागिल पंधरा दिवसापासुन मृत्युशी चाललेली झुंज अखेर काल (शुक्रवारी) अपयशी ठरली आहे. वरील बाळाचा उपचारादरम्यान औंध येथील शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला आहे.
रुक्मीणी शिवाजी पात्रे हे त्या हालअपेष्ठा झालेल्या अभागी महिलेचे नाव आहे. मागिल (ऑगष्ट) महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात पडत्या पावसात रुक्मीणी पात्रे या सातव्या महिण्यातच बाळंतीण झाल्या होत्या. सातव्या महिण्यातच बाळ जन्माला आल्याने, बाळाचे वजन अंत्यत कमी असल्याने, बाळाला व त्याची आई, रुक्मीणी पात्रे या दोघांनाही उपचाराची गरज होती. मात्र बाळाला ठेवण्यासाठी काचेची पेटी नसल्याच्या कारणावरुन चार दिवसात तीन वेळा कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुण्यातील ससुन रुग्णालयाने उपचारासाठी दाखल करुन घेतले नव्हते.
दरम्यान शिवसेनेच्या सहकार आघाडीचे पुर्व हवेलीमधील पदाधिकारी स्वप्निल कुंजीर यांच्या मध्यस्थीनंतर बाळाला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र बाळाचा उपचाराची अंत्यत गरज असतानांच, उपचार न निळाल्याने, बाळाची तब्बेत खालावली होती. अखेर पंधरा दिवसानंतर औंध रुग्णालयात बाळाचा उपचारादरम्यान अखेर शुक्रवारी मृत्यु झाला.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच, दुसरीकडे आर्थिक परीस्थिती नसल्याने आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील तीन दिवसाची ओली बाळंतीन व तिच्या तिन दिवसाच्या मुलाला उपचार मिळावेत यासाठी कुंजीरवाडीपासुन, ससुन सारख्या शासकीय रुग्नालयाचे उंबरे झिझवावे लागले होते. शिक्षण, आरोग्य या सारख्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या पुण्यात, गरजेच्या वेळी वैदकीय उपचार मिळु न शकल्याने चाळीस दिवसाच्या बाळाचा मृत्यु होणे ही बाब प्रगत पुण्याच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबा हद्दीतील कोळस्कर वस्तीवर नामदेव देढे व त्यांचे वडील व आई मागिल वीस वर्षापासुन राहतात. नामदेव देढे याची मोठी बहिण रुख्मिणी पात्रे ऑगष्ट महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या वडीलांच्या हाहत्या घरात बाळंतीण झाल्या होत्या. रुक्मीनीचे सातव्या महिन्यातच बाळंतपण झाले असल्याने, तिला झालेल्या बाळाचे वजन कमी भरले. यामुळे बाळाला व तिच्या आईला उपचाराची गरज असल्याने, देढे कुटुंबियांनी सलग तीन दिवस ओली बाळंतीन व तिच्या बाळाला उपचारासाठी कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नेले होते. मात्र त्या ठिकाणी बाळाला ठेवण्यासाठीकाचेची पेटी नसल्याने, तेथील कर्मचाऱ्यांनी रुक्मीनीला व तिच्या बाळाला तिनही वेळी उपचारासाठी ससूनला घेऊन जाण्यासाठी मदत केली होती. मात्र सदर महिलेबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही कर्मचारी न गेल्याने, ससुन रुग्णालयात रुक्मीणी पात्रे यांना दाखल करुन घेतले नव्हते. ही बाब स्वप्निल कुंजीर यांना समजताच, त्यांनी कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे यांच्या मदतीने पुण्यातील औंध रुग्नालयात दाखल केले.
दरम्यान, रुख्मिणी पात्रे यांच्या बाळावर मागिल पंधरा दिवसापासुन औंध येथील शासकीय रुग्नालयात उपचार चालु होते. मात्र बाळाला गरजेच्या वेळी उपचार न मिळाल्याने, बाळाची प्रकृती चिताजणक बनली होती. यात त्याचा मृत्यु झाला. जर बाळाला पहिल्या दिवसापासुन उपचार मिळाले असते तर, कदाचित बाळाचे प्राण वाचु शकले असते.
याबाबत बोलतांना स्वप्निल कुंजीर म्हणाले, “वजन कमी असल्याने, मरणाच्या दारातील बाळावर गरजेच्या वेळी ससुन साख्या मोठ्या रुग्णालयाने उपचार नाकारणे बाब पुण्याच्या प्रतिमेला न शोभणारी आहे. ससुन सारख्या मोठ्या रुग्णालयाने बाळाला उपचाराशिवाय परत पाठवणे ही बाब अतिशय चिड आनणारी आहे. तसेच कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी महिलेला ससुनला पाठवतांना, स्वतः ही जाणे गरजेचे होते. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर कारवाई होण्याची गरज आहे. तरच पुण्याचे नाव व लौकीक वाढणार आहे.”