पुणे : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हिवाळ्यात तुमच्या स्किनची कशी काळजी घ्यायची याबद्दल आम्ही तुम्हाला काही ब्युटी टिप्स बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हिवाळ्यातही तुमची त्वचा चमकदार होईल. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते, म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या त्वचेची तसेच आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.या ऋतूत आपली त्वचा योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आपण काही ब्युटी टिप्स फॉलो करायला हव्यात.
स्किन केअरमध्ये बदल करा
तुमची हिवाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या उन्हाळ्यासारखी नसावी. ऋतू बदलत असताना तुमची दिनचर्या बदलणे खूप महत्त्वाचे ठरते. आपल्या स्किन केअरमध्ये नियमित बदल करणे खूप महत्वाचे आहे जसजसे तापमान कमी होत जाईल, तसतसे तुमचे रेगुलर ब्यूटी प्रोडक्ट तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार हंगामाला अधिक अनुकूल असलेल्या प्रोडक्टने बदला.
त्वचा हायड्रेटेड ठेवा
मॉइश्चरायझर हा कोणत्याही ब्युटी रूटीनचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर करता येतो. त्वचा कोरडी होऊ नये, यासाठी तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे.
SPF देखील आवश्यक आहे
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कमी सूर्यप्रकाश असतो, परंतु या ऋतूमध्ये अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी तुम्ही हिवाळ्यात सनस्क्रीन वापरू शकता. एसपीएफ म्हणजे सूर्य संरक्षण घटक. एसपीएफ प्रत्येक दिनचर्याचा एक भाग असावा.
क्लिंझर वापरा
जेव्हा हिवाळा येतो तेव्हा आपण असे क्लिंझर निवडले पाहिजे, जे आपल्या त्वचेनुसार असेल. बहुतेक क्लिंझर क्रीमवर आधारित असतात कारण ते त्वचेला कोरडे होऊ देत नाहीत आणि त्वचेला पोषण देतात. हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. म्हणूनच त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणारा फॉर्मुला हवा.