Skin Care | उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे त्वचा रुक्ष व निस्तेज बनते. मात्र काही घरगुती उपाय केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होऊ शकतो. जाणून घ्या त्वचा कोरडी पडू नये किंवा त्वचा कोरडी पडली तर कोणती काळजी घ्यावी , घरगुती उपाय करावेत याविषयी माहिती –
१. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला आणि हातापायाला खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेलाने त्वचेचा रुक्षपणा कमी होतो.
२. मध व गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.
३. दोन चमचे ग्लिसरीनमध्ये एक चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. पंधरा-वीस मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
४. हात-पाय धुताना किंवा अंघोळ करताना कोमट पाणी वापरा. अति गरम पाण्यामुळे त्वचा रुक्ष बनते.
५. कोरफड त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतं. रात्री झोपताना कोरफडीचा रस किंवा कोरफड जेल त्वचेला लावा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News | साखर खाण्याची सवय सोडविण्यासाठी ;या; उपायांचा अवलंब करा
Health Care | सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे
Health Care | ‘या’ आजारांवर आंबेहळद गुणकारी, जाणून घ्या कसा करावा वापर