राहुलकुमार अवचट
यवत – राज्य शासनाच्या वतीने लोक कल्याणकारी योजनेअंतर्गत प्रारंभ महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण आरोग्य विभागात, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने यवत ग्रामीण रुग्णालयात सर्व माता भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन यवतचे विद्यमान सरपंच समीर दोरगे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य सदानंद दोरगे, यवत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत इरवाडकर,डॉ गरड, परिचारिका खराडे ,भानुसे , बागवान, आढाव ,वरवंडकर, पद्मा पवार , कर्मचारी राहुल घेवरे, शहाणे, स्वामी, संतोष जावळे यांसह यवत परीसरातील माता व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना दोरगे म्हणाले, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने माता सुरक्षित घर सुरक्षित या मोहिमेअंतर्गत राज्यातील माता भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी ५ ऑक्टोबर पर्यंत चालू राहील” माता सुरक्षित घर सुरक्षित” या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, लवकरच मुख्य शिबिराची तारीख घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून माता-भगिनीं महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन विविध तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असुन यवत पंचक्रोशीतील महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. इरवाडकर यांनी केले आहे,