Pune News पुणे : नवमातांनो सावधान, बाळाची काळजी घ्या. अन्यथा बाळाच्या श्वासनलिकेत दूध गेल्याने अनर्थ होत आहे. आणि त्याचा परिमाण नवजात बाळाला जीव गमवावा लागत आहेत. त्यामुळे मातेसह कुटुंबातील सर्व सदस्यांनी बाळाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. (Pune News)
बाळाचा अकाली जन्म, जन्मत: कमी वजन; जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, श्वसनावरोध, आघात, अशी नवजात बालकांच्या रुग्णालयातील मृत्यूची कारणे आहेत; परंतु घरी असलेल्या नवजात बाळाला सांभाळताना झालेली एक चूक देखील महागात पडू शकते.(Pune News)
बालके नि:शब्द असतात, ते आपल्या समस्या कृत्यातून आणि रडण्यातून मांडतात. यामुळे बाळाचा सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांना सतत सावध राहून बाळाच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असते. थोडासा हलगर्जीपणादेखील बाळाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. नुकतीच याची ही दोन उदाहरणे समोर आली आहेत(.Pune News)
दरम्यान, गोंदिया येथून एक महिला आपल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याला घेऊन नागपुरात नातेवाइकांकडे आली. दुपारी बाळाला दूध पाजले आणि लगेच पाळण्यात टाकले. अर्ध्या तासानंतर बाळाला उठवायला गेले असताना ते थंड पडले होते. डॉक्टरांना दाखविल्यावर मृत घोषित केले. दूध श्वसननलिकेत गेल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे निदान झाले. तर दुसऱ्या घटनेत २० दिवसांच्या नवजात बाळाला आई झोपून दूध पाजत असताना त्याचा गुदमरून मृत्यू झाला. काही घटना वगळता निष्काळजीपणाचा हा कळस असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे(.Pune News)
झोपून दूध पाजू नका- डॉ. निलेश उपरे
याबाबत बोलताना विश्वराज हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ निलेश उपरे म्हणाले कि, ज्या घरात नवजात बाळ आहे त्यांनी अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे असते. बाळाला झोपून दूध पाजू नये. दूध पाजल्यानंतर बाळाची ढेकर काढावी. बाळ ढेकर देईलच असे नाही. परंतु, दूध दिल्यानंतर त्याला हळुवार उचलून धरावे. त्यानंतर बाळाला डाव्या कुशीवर थोडे उंच ठेवून झोपवावे.
बाळाला ठाराविक वेळेत थोडे थोडे दूध पाजावे. भुकेलेले बाळ पटापट दूध पिते व जास्तीचे प्यालेले दूध बाहेर टाकते अशावेळी श्वसननलिकेत दूध जाण्याची भीती असते. कमी वजनाचे बाळ असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी. रात्री नवजात बाळाजवळ झोपताना खबरदारी घ्यावी. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा(.Pune News)