(New Virus) पुणे : कोरोनानंतर ज्या विषाणूची भीती व्यक्त केली जात आहे. त्या विषाणूने पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे काळजीचे वातावरण वाढले आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच ३ एन २’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण जानेवारी ते मार्च दरम्यान आढळले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे..!
सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) याचा अहवाल दिला आहे. या अहवालातून शहरात या विषाणूची साथ पसरली असल्याचेशिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे हा यावर योग्य उपाय ठरु शकतो. तसेच काळजी घेण्याचे देखील आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
कोरोनामुळे जसा मोठा धोका आहे. त्याप्रमाणेच हा विषाणू धोकादायक नाही. ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काळजी घ्यावीच लागणार आहे. या विषाणूची लक्षणे ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहेत.
देशभरात ‘एच ३ एन २’ या विषाणूची साथ पसरलेली आहे. पुण्यातदेखील रुग्णांना याची बाधा झाली आहे. दरम्यान, शहरात जानेवारी ते मार्च या कालावधीत नायडू हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १०५ संशयित रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’ला तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले हाेते. या रुग्णांच्या नमुन्यांपैकी २२ नमुन्यांचा अहवाल ‘एच ३ एन २’ साठी पॉझिटिव्ह आला आहे. या नमुन्यांची संख्या जरी कमी असली तरी ते रुग्ण केवळ नायडू हाॅस्पिटलमध्ये जे उपचारासाठी आले त्यांचे ते नमुने आहेत. उर्वरित खासगी रुग्णालयातील रुग्णांचा समावेश नाही. त्यामुळे, कोरोनासारखी ही साथ पसरली असण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी!
Weather News : राज्यात सोमवारनंतर पाऊसाची पुन्हा हजेरी