Mumps Dieses : मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मम्प्स आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. याला गालगुंड असेही म्हणतात. हा एक संक्रमित आजार असून मुलांना त्वचेची समस्या उद्भवते. मुंबईत याचे रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात गालगुंडाची साथ पसरली आहे. हा आजार झालेल्या व्यक्तीस डोकेदुखी, ताप आणि थकवा यासारखी सौम्य लक्षणे दिसू लागतात.
1967 मध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर, रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. पण कधी कधी त्याचा उद्रेक अजूनही होत असतो. हा संसर्गजन्य आजार असून एका मुलातून दुसऱ्या मुलांमध्येही पसरू शकतो. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाला इतर मुलांपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले, आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे, विषाणूविरूद्ध लसीकरण न केलेल्यांना गालगुंडाचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो.
गालफुगीमुळे, सर्दी ताप येणे,पोटाचे विकार, उलट्या अशा त्रासांनी रुग्ण त्रस्तयत आहेत. हा आजार लक्षात येताच बाधित बालकावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. अशा वेळी रुग्णावर अॅण्टीबायोटीक देऊन उपचार केले जातात. एवढेच नव्हे तर या आजारावर वेळीच उपचार न केल्यास बालकाची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे मुलांनी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.