Mumbai News : मुंबई : बदला घेण्यासाठी कोण काय करील हे सांगता येत नाही. ट्रकची स्कूटरला धडक बसली म्हणून चिडलेल्या दुचाकीचालकाने चक्क मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. ट्रकमध्ये दहशतवादी कारवायांसाठी लागणारे सामान असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या माहितीमुळे पोलीस खाते खडबडून जागे झाले. अॅक्शन मोडमध्ये येत संबंधित ठिकाणी जाऊन ट्रकची तपासणी केली असता, हा फेक कॉल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर मात्र बदला घेणाऱ्या दुचाकीस्वाराची झोपच उडाली. सध्या हा आरोपी अटकेत आहे.
कांजुरमार्ग येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईतील कांजुरमार्ग येथील रहिवासी असलेला निलेश देवपांडे हा स्कूटरवरुन जात असताना एका ट्रकने त्याच्या स्कूटरला मागून धडक दिली. (Mumbai News) या धडकेत निलेशला दुखापत झाली नाही, तसेच त्याची स्कूटी देखील सुस्थितीत आहे. मात्र, आपल्या दुचाकीला ट्रकने धडक दिली ही गोष्ट त्याला चांगलीच खुपली. या घटनेचा बदला घेण्यासाठी तो हट्टाला पेटला.
ट्र्कचालकाचा बदला घेण्याच्या अट्टाहासापायी त्याने रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांना फोन करून पोलिसांची झोप उडवली. ट्र्कमध्ये दहशतवादी कारवायांसाठी लागणारे सामान असल्याचे पोलिसांना सांगितले. ही माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले. (Mumbai News) महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि गोवा पोलीस नियंत्रण कक्षालाही याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तत्काळ ट्रकचा शोध सुरु झाला. मात्र, तपास पूर्ण करत ट्रकचा शोध घेतला असता भलतेच प्रकरण समोर आले. फोनवरुन मिळालेल्या माहितीवरुन तपास केला असता हा फेक कॉल असल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी निलेशला अटक केली.
दरम्यान, पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने देवपांडेला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. (Mumbai News) कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत दिशाभूल करण्याचा आणि व्यत्यय आणण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याबद्दल आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : धक्कादायक; ४ मुलींचा ६० हजारांत सौदा; नवी मुंबईत ऑनलाइन सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!
Mumbai News : पाकिस्तानी दहशतवादी… मुंबई पोलीस कंट्रोल रूमला फोन; एटीएस सतर्क!