पुणे, ता.३१ : ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. हो, पण हे खरंय… अंडी आपल्या आहारात असल्यास याचा चांगला फायदा होतो. निरोगी व्यक्तीने दररोज किमान एक अंड्याचे सेवन केले पाहिजे. आहारात अंड्याचा समावेश असल्यास शरीरातील व्हिटॅमिन-डीची कमतरता पूर्ण केली जाऊ शकते. जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी हेल्दी सुपरफूड ठरू शकते.
अंडी ही जर आरोग्यासाठी चांगली असली तरी त्याचं प्रमाण कमीच असावं. दोन-तीन पेक्षा अधिक अंडी खाऊ नये. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलच्या पातळीत लक्षणीय वाढ होत नाही. अंड्याचा पांढरा भाग खाणे देखील फायदेशीर आहे. पण आठवड्यातून किती अंडी खाण्यास आरोग्यदायी आहेत हे संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर आणि दैनंदिन आहारावर अवलंबून असते. एका दिवसात तीन अंडी खाणे प्रत्येकाच्या शारीरिक संरचनाप्रमाणे योग्य ठरु शकतं. तर एका आठवड्यात 15-20 अंडी निरोगी व्यक्तीसाठी फायदेशीर आहेत.
अंडी खाल्ल्याने शरीरातील एचडीएल (हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन) ची पातळी वाढते. त्यात गुड कोलेस्टेरॉल असते, त्यामुळे ते कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. अंड्यांमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. त्यानंतर कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. हे तिन्ही घटक निरोगी राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. महिलांनी देखील अंडीचे सेवन केले पाहिजे. दररोज एक अंडं खाल्ल्याने महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका संशोधनात आढळले आहे.