पुणे प्राईम न्यूज डेस्क: थोडाजरी अशक्तपणा आला की लगेच काहीतरी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात लिंबू पाणी पिण्याचे देखील सांगितले जाते. पण अशक्तपणात लिंबू पाणी नक्कीच फायद्याचे ठरते. लिंबू आणि आंबट फळं ही व्हिटॅमिन सी युक्त असून, यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे नसांना हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
याशिवाय व्हिटॅमिन सी हे शरीरातील हार्मोनला प्रेरित करून लोहाच्या अवशोषणासाठी मदत करतात. यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि तुम्ही नेहमी उत्साही आणि ताजेतवाने दिसता. मात्र, सर्दी झाल्यास लिंबू पाणी पिणे टाळायला हवे. इतरवेळी लिंबू पाणी प्यायल्याने आम्लपित्तापासून आराम मिळतो. तसेच पोटाशी संबंधित आजारात नाहीसे होतात. दररोज नियमित काळे मीठ घालून लिंबू पाणी प्यायल्यास पोट चांगले साफ होण्यास मदत होते. यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील फायदा होतो.
तसेच लिंबू पाण्याने सी व्हिटॅमिन्स शरीराला मिळते. लिंबू पाण्यात जर काळे मिठ टाकून हा रस प्यायला तर शरीराला फायदा होता. त्याने पीएच लेव्हल चांगली बॅलन्स होते. पोटाशिवाय हाडांसंबंधी आजारातही लाभ होतो. लिंबू पाणी रोज प्यायल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. या गंभीर आजारात लिंबू पाण्याचा खूपच लाभ होत असतो.