पुणे प्राईम न्यूज डेस्क: रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. पण हे खरंय…कारण रक्तदान एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवतेच. याशिवाय, जो कोणी रक्तदान करतो त्याचंही आरोग्य सदृढ राहते. रक्तदान करण्याचे अनेक फायदे आहेत. याची माहिती काहींना असते तर काहींना नसते. या रक्तदानामुळे वजन कमी करण्यास मदत होण्यासोबत इतर अनेक फायदे आहेत. (Health News)
हृदयरोगाचा धोका करते कमी
रक्तातील लोहाचे प्रमाण अधिक असेल तर नसांना ब्लॉक करते आणि यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तदान केल्याने हृदयापर्यंत रक्तप्रवाह योग्य राहून हृदयरोगाचा धोका राहत नाही.
वजन कमी करण्यास होते मदत
तुमचे वजन जास्त वाढले असेल तर रक्तदान करण्याने यामध्ये फरक पडतो. अर्थात वजन कमी करणे हे मुख्य नियमांमध्ये बसत नाही. पण रक्तदान केल्याने वजन कमी करण्यासह सहनशक्तीही वाढते. ब्लड सेल्सने अधिक उत्पादन होऊन आरोग्याला फायदा मिळतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर
रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाईट्सची वृद्धी होते. ल्युकोसाईट्स आपल्या प्रतिकारशक्तीसाठी कार्यरत असतात. कोणत्याही गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती योग्य असणे गरजेचे आहे.
रक्तदान कॅन्सरपासून ठेवते दूर
रक्तात लोह अधिक प्रमाणात साठू नये म्हणून रक्तदान करावे. रक्तात लोह जमा झाल्यास, ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरपासून लांब राहायचे असेल तर रक्तदान नियमित करावे. रक्तात लोह अधिक प्रमाणात झाल्यास रक्तदान हा लोह कमी करण्याचा चांगला पर्याय आहे.