Health News: पुणे : अनेकदा कोणतंही शारीरिक दुखणं वाटलं की डॉक्टरकडे न जाता पेनकिलरचा वापर सर्रासपणे केला जातो. याच पेनकिलरमुळे बहुतांश वेळा आरामही मिळतो. पण पेनकिलर अतिप्रमाणात घेणे किंवा रोज घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटाचे विकारही उद्भवू शकतात.
सध्या बाजारात अशा काही गोळ्या आहेत ते काम करतात पेनकिलरचे पण त्यातून आपल्याला समस्यांपासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते. मात्र, नंतर याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. एनएसएआयडी, पॅरासिटामॉल आणि ओपिओईड्स यांसारख्या गोळ्या आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. पॅरासिटामॉल हे औषध शरीर काही प्रमाणात सहन करू शकते. परंतु, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅलर्जीच्या अनेक तक्रारी येऊ शकतात.
पेनकिलर जास्त प्रमाणात सेवन केल्यास बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत डॉक्टर आपल्याला हाय पॉवरचं औषध लिहून देतात. मात्र, त्यासोबत अँटासिड किंवा लॅक्सेटिव्हही देतात ज्यानं कफ आणि अपचन होत नाही. पेनकिलर अधिक वेळा घेतल्याने तोंडाला कोरड पडते. त्यामुळे आता पेनकिलर घेण्याऐवजी डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याच सल्ल्याने औषधे घेतल्यास त्याचा चांगला परिणाम जाणवू शकतो.