Health Tips: पुणे : मानवी शरीरात रक्त हे आपल्याला अत्यंत गरजेचे असते. त्याची कमतरता भासल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य असायला लागते. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये बदल करावा लागणार आहे.
रक्त वाढवण्यासाठी टोमॅटो खाण्याचा सल्ला दिला जातो. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. तसेच जांभळाचा सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
याशिवाय, रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा, असे केल्याने रक्ताचे प्रमाण वाढू शकते. डाळिंब देखील फायद्याचे ठरू शकते. डाळिंबामुळे रक्तातील हिमोग्लोबिन भरपूर वाढते. डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिनं, कर्बोदकं आणि फायबर असतात. यामुळे शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढायला मदत होते.