Health News: पुणे प्राईम न्यूज डेस्क: दातांची वेळच्या वेळी काळजी घेण्याचा सल्ला दंत चिकित्सक अर्थात डेंटिस्टकडून दिला जातो. जर दातदुखीवर वेळीच उपचार केले नाहीतर मोठा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे त्या वेदनाही असह्य होतात. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास घरबसल्या आराम मिळू शकतो.
लवंगाचा वापर दात आणि दाढदुखीसाठी गुणकारी मानला जातो. दातदुखीवर लवंग खाऊ शकता किंवा लवंग तेल वापरूही शकता. लवंगामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करतात. तसेच दातदुखीचा सामना करण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जाऊ शकतो. यासाठी तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा टाका आणि दुखणाऱ्या दातांवर आणि दाढांवर लावा.
याशिवाय, मीठ नैसर्गिक पद्धतीने कीटकांना मारण्यास मदत करते. दात आणि दाढदुखीचा सामना करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून गार्गल करा. ही खूप जुनी आणि प्रसिद्ध अशी उपचार पद्धती आहे. बर्फानेही आराम मिळू शकतो. बर्फ हा कोणत्याही प्रकारची सूज बरी करण्यासाठी चांगला आहे. गालाच्या बाजूला बर्फाचा पॅक लावावा, हे दिवसात 2-3 वेळा केल्यास गुणकारी ठरू शकते. हे सर्व घरगुती उपाय केल्यास दातदुखीपासून नक्कीच काही प्रमाणात आराम मिळू शकेल.