Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क: अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सर्दी-खोकला हा जाणवतोच. हा आजार जरी किरकोळ स्वरूपात वाटत असला तरी जेव्हा हा होतो तेव्हा मात्र चांगलाच त्रास होत असतो. पण सर्दी-खोकला घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
सर्दी आणि खोकल्यासाठी मधाचा वापर अनेकदा केला जातो. मध हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असणारा घटक आहे. मधाचे सेवन केल्याने खोकला कमी होतो. मध आणि लवंग एकत्र घेऊन याचे सेवन केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसेच लवंग ठेचून मधामध्ये मिक्स करावी आणि हे मिश्रण दिवसातून २-३ वेळा सेवन केल्यास आराम मिळू शकतो. तसेच सर्दी-खोकला आल्यास वाफ घेणे हे देखील चांगले फायद्याचे होऊ शकते. गच्च झालेले नाक वाफ घेतल्याने उघडते आणि श्वास घेण्यात होत असलेला अडसर देखील कमी होतो.
याशिवाय, मध आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. आले आणि मधाचा रस हा थोडासा गरम करावा. हा गरम रस प्यायल्यास आराम मिळू शकतो. तसेच कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यासही गुणकारी ठरू शकते. यामुळे कोणताही त्रास होत नाही. कोमट पाण्यात मीठ मिक्स करून पाण्याच्या गुळण्या केल्यास, घसादुखी लवकर कमी होईल आणि कफ निघून जाण्यास मदत होऊ शकेल.