सध्याच्या काळात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुलेदेखील मैदानी खेळ न खेळता मोबाईलवरच खेळ अर्थात गेम खेळताना दिसत आहे. त्यावेळी मोबाईलमधून अनेकदा मोठा आवाजही येतो. हाच आवाज टाळण्याची आता गरज निर्माण झाली आहे. तसे न केल्यास तुमच्या मुलांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्यापासून रोखण्यासाठी स्क्रीन एक्सपोजर मर्यादित करणे आणि गेमिंगचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. बहिरेपणा आणि श्रवणशक्ती कमी होण्यापासून रोखण्यासाठी आणि कान आणि श्रवणविषयक काळजी घेण्याबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. स्क्रीन टाईमच्या वाढत्या एक्सपोजरमुळे आणि ऑनलाईन गेममधील मोठ्या आवाजामुळे मुलांना ऐकू न येण्याची समस्या सर्वाधिक असू शकते.
मोठ्या आवाजामुळे, गेमिंगमुळे आणि जास्त स्क्रीन टाईममुळे लहान मुलांना ऐकू न येण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे पालकांना त्यांचे एक्सपोजर मर्यादित ठेवण्याचा सल्ला आता दिला जात आहे. मुलांना श्रवण समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी नियमित श्रवण तपासणी आणि सुरक्षित ऐकण्याच्या सवयी लावणे गरजेचे आहे. त्याने मुलांना फायदा होऊ शकतो.