Job News : नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सरकारी विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही देखील बारावी पास असाल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते. होय, केरळ सरकारच्या एका विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
‘केरळ स्टेट फायनान्शियल एंटरप्रायझेस लिमिटेड’ने व्यवसाय प्रवर्तक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ‘केएसएफआय’ने यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे. ज्या उमेदवारांकडे या पदांशी संबंधित पात्रता आहे ते ऑनलाईन माध्यमातून अधिकृत वेबसाईट ksfe.com वर जाऊन अर्ज करू शकतात.
एकूण पदसंख्या किती?
या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 3000 पदे भरली जाणार आहेत.
पात्रता काय असावी?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती?
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे.
किती मिळू शकतो पगार?
तुमची या भरती प्रक्रियेत निवड झाली तर तुम्हाला 9300 ते 114800 रुपये पगार दिला जाऊ शकतो.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. ऑफलाइन (पोस्टाद्वारे) अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2023 असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार 10 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.