Jalgaon News : जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचा पाचवा बळी?
यंदाच्या मोसमातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचा हा पाचवा बळी असल्याचे बोलले जात आहे. याआधी अमळनेरमधील एका विवाहीतेचा मृत्यू झाला होता. (Deputy Sarpanch dies of heatstroke in Jalgaon; In the area)
कमलाकर आत्माराम पाटील (वय 45) असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते.(Jalgaon News)
उपसरपंच कमलाकर पाटील यांचे वावडदा शिवारात शेत आहे. रात्री बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतातील कामे दिवसा करावी लागतात. या अनुषंगाने कमलाकर पाटील आणि त्यांच्या घरातील महिला यांनी दिवसभर काम केले. प्रचंड उन्हामुळे सायंकाळी त्रास व्हायला लागला. (Jalgaon News) सुरुवातीला त्यांना लिंबू पाणी देऊन उपचार केले. त्यानंतर त्यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, गावातील उपसरपंच यांचा मृत्यू झाल्याने शनिवारी गावातील सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. (Jalgaon News)या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. कमलाकर पाटील यांच्या माघारी पत्नी, आई, मुले व भाऊ असा परीवार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Heat Stroke | उष्मघातामुळे आणखी एक बळी; नांदेडमधील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…
Heat Stroke : लग्नाचा आनंद काळाने घेतला हिरावून ; उष्माघाताने विवाहितेचा मुत्यू ; जळगावातील घटना..