युनूस तांबोळी
Influenza Precaution Tips | शिरूर : सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात एन्फ्लुएंझा या आजाराने रूग्ण आढळून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता ‘कोविड’ व ‘एन्फ्लुएंझा’ आजार टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जाऊन औषध घ्यावीत. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोवीड व एन्फ्लुएंझा हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो…
कोवीड व एन्फ्लुएंझा हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र, याचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षाखालील बालके, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजार ग्रस्त असलेल्या लोकांना जास्त आहे.
एन्फ्लुएंझा आजारापासून सुरक्षीत राहण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने नियमित हात धुवावेत. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, खोकताना आणी शिंकताना तोंडावर रूमाल वापरावा. डोळे आणि नाकाला स्पर्श करू नये., भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी.
फळे, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा, आजार टाळण्यासाठी हस्तांदोलन करणे टाळावे, डॅाक्टरांच्या सल्लाने औषध घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे इत्यादी बाबी टाळाव्यात तसेच पौष्टिक आहार घ्यावा, धुम्रपान टाळावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, आदींचा आहारात वापर करावा. असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
‘एन्फ्लुएंझा’ ची लक्षणे…
सतत खोकला येणे, तीन ते पाच दिवस ताप येणे, थंडी वाजणे, घसा खवखवणे, धाप लागणे, कोरडा खोकला ( तीन आठवडे पर्यंत राहणे), थकवा येणे,मळमळ होणे, अंगदुखी, अतीसार अशी लक्षणे आहेत.
असा होतो आजार…
एन्फ्लुएंझा हा संसर्गजन्य आजार आहे. एच३, एन२ विषाणुला एन्फ्लुएंझा विषाणू म्हणून ओळखले जाते. वातावरणातील बदलाच्या काळात श्वसनयंत्रणेशी निगडित व्हायरल इन्फेक्शन होऊन या आजाराची लक्षणे दिसू लागतात. रक्त नमुन्यतील तपासण्यात या आजाराची लागण झाल्याची निदान होते.
हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे. त्यामुळे खोकला, शिंका , संक्रमित व्यक्तिच्या जवळ जाणे टाळावे. एन्फ्लुएंझा बाबत वेळेत तपासण्या व उपचार घ्यावेत. कॅन्सर, किडनी विकार, श्वसन विका, असलेल्या लोकांनी एन्फ्लुएंझा च्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॅा. निखील इचके यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे
Health News | वजन कमी करण्यासाठी, चिया बिया गुणकारी; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे
Health News | साखर खाण्याची सवय सोडविण्यासाठी;या; उपायांचा अवलंब करा