पुणे : मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल का, अशी शंका निर्माण झाली आहे, कारण जगभरातील पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या गेल्या 45 वर्षांत निम्म्याहून जास्त कमी झाली आहे. भारतीय पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे.’ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट’ जर्नलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
या संशोधनात दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील 53 देशांतील 57,000 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या अधिक वेगाने कमी होऊ शकते. शुक्राणूंची संख्या 4 कोटी प्रति मिली पेक्षा कमी असल्यास पुरुषांना वंध्यत्वाचा त्रास होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे ही चिंतेची बाब आहे.
जगातील 3 सर्वात मोठ्या संस्था माउंट सिनाई मेडिकल सेंटर (मियामी), कोपनहेगन विद्यापीठ (कोपनहेगन) आणि हिब्रू विद्यापीठ (जेरुसलेम) यांनी संयुक्तपणे पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर संशोधन केले. हा संशोधन अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.
शुक्राणूंची संख्या कमी होण्याची अनेक कारणे ..
लठ्ठपणा आणि योग्य आहार न घेणे हे शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे आणखी एक प्रमुख कारण आहे.
पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन या सेक्स हार्मोनच्या असंतुलनामुळे शुक्राणूंची संख्याही कमी असते.
शुक्राणूंशी संबंधित अनुवांशिक आजार, प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग, लैंगिक आजार गोनोरिया यामुळेही शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
अन्न, पाणी आणि हवा यांच्याद्वारे शरीरात एंडोक्राइन डिसरप्टिंग केमिकल पोहोचतात. त्याचे प्रमाण वाढल्याने शरीरातील इतर हार्मोन्सवर परिणाम होतो.
पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होणे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषणावर अवलंबून असते.
अति धुम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे देखील पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
ReplyForward
|