नवी दिल्ली: कोब्रा, किंग कोब्रा, मण्यार, ब्लॅक मांबा यांसारख्या अत्यंत घातक विषारी सापांच्या विषाला निष्प्रभावी करते. शास्त्रीय भाषेत या विषाला न्यूरोटॉक्सीन म्हणतात. न्यूरोटॉक्सीन चेतापेशी यंत्रणेवरच हल्ला करते. आता आयआयएससीच्या स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सेंटर फॉर इकोलॉजिकल सायंसेसच्या इव्हॉल्युशनरी वेनोमिक्स लॅबच्या शास्त्रज्ञांनी या विषाला निष्प्रभावी करणाऱ्या अँटीबॉडी विकसित केल्या आहेत. एचआयव्ही आणि कोविड-१९ विषाणूविरोधात अँटीबॉडी विकसित करण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर करण्यात आला, त्याच पद्धतीने सापाच्या विषावरील अँटीबॉडी विकसित करण्यात आल्याचे या संस्थेतील पीएच.डी.च्या विद्यार्थिनी सेनजी लक्ष्मी आरआर यांनी सांगितले.
या संशोधनामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये व्यापक सुरक्षा मिळू शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. सध्या घोडे, खेचर यांसारख्या अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये इंजेक्शनद्वारे कमी प्रमाणात विष टोचून त्यांच्या रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडी हाच सर्पदशांवरील उतारा आहे. सर्पदंशामुळे भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात.