तुम्हाला सतत डोकेदुखी, विशेषतः सकाळी उठल्यावर तीव्र डोकेदुखी, उलट्या किंवा मळमळ, विशेषतः डोकेदुखीबरोबर उलट्या होणे. दृष्टीतील बदल, धूसर दिसणे, दुहेरी दिसणे किंवा अचानक दृष्टी कमी होणे, यासारखी लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ब्रेन ट्युमरची सामान्य लक्षणे
झोप लागण्यात अडचण किंवा सतत झोप येणे. संतुलन बिघडणे, चालताना अडखळणे किंवा चक्कर येणे.
संभाषणातील बदल, शब्द विसरणे, बोलण्यात अडथळा. स्मृतीत बदल, विसरभोळेपणा किंवा गोंधळलेपणा. आकस्मिक झटके, पूर्वी कधी न आलेले झटके येणे. शारीरिक अशक्तपणा, शरीराच्या एका बाजूला कमजोरी जाणवणे. मनस्थितीत बदल, चिडचिड, उदासीनता किंवा व्यक्तिमत्त्वात अचानक बदल.
जर तुम्हाला किंवा कोणाला ही लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. MRI किंवा CT Scan च्या सहाय्याने ट्युमरचं निदान केलं जाऊ शकतं.
(टीप: सदर माहिती ही वाचकांसाठी पुरवण्यात आलेली आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या)