Healthy Tips | पुणे : शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी वातावरण, विचारसरणी आणि आहार खूप महत्वपूर्ण आहेत.
जाणून घ्या मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा –
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् (Omega-3 Fatty Acids)
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्मेंदूतील इनफ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मूड सुधारतो आणि नैराश्य आणि चिंतेची लक्षणे कमी होतात.
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् युक्त पदार्थ
फॅटी फिश, फ्लॅक्ससीड, शिया सीड्स, सोयाबीन्स इत्यादींमध्ये हे आढळते.
व्हिटॅमिन डी (Vitamin D)
व्हिटॅमिन डी मूड नियंत्रित करण्यास आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, सतत आजारी पडणे, थकवा जाणवणे, केस गळती, उदास वाटणे, चिडचिडेपण वाढणे, स्थूलता येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. कोवळ्या ऊन्हाबरोबरच काही पदार्थांमध्येही व्हिटॅमिन डी आढळते.
व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ
दूध, कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या, मशरुम, सोयाबीन दूध, संत्री,गाजराचा रस, दही
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (Vitamin B-Complex)
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स मूड नियंत्रित करण्यास, तणाव आणि चिंता कमी करण्यास आणि मेंदूच्या निरोगी कार्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात. जीवनसत्त्वांच्या या गटामध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 यांचा समावेश होतो. हे जीवनसत्त्वे चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्सयुक्त पदार्थ
होल व्हीट, ब्राऊन राईस, नाचणी, पालेभाज्या, अंडी, चिकन-मटण, डेअरी प्रोडक्ट इत्यादीमध्ये हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health Tips | अकाली टक्कल पडू नये म्हणून केसांची अशी घ्या काळजी
Healthy Tips | डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे
Summer Tips | उन्हाळ्यात घामोळ्यांनी त्रस्त आहात?, मग हे घरगुती उपाय करून पहा
Healthy Tips | उभं राहून पाणी का पिऊ नये, जाणून घ्या शास्त्रीय कारणे
Health Tips | लहान मुलांना दुधासोबत ‘हे’ पदार्थ खायला देणे टाळावे