मुंबई : मंकीपॉक्सचे रुग्ण 78 देशांमध्ये आढळले आहेत. यामध्ये कोणती दोन नवीन लक्षणं समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. भारतात अद्यापपर्यंत ४ रुग्ण आढळले आहेत.
ताप, डोकेदुखी, शरीरावर रॅश उठणे किंवा फोड येणं या लक्षणांसोबत आता आणखी दोन नवीन लक्षणं मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब असून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन केलं आहे.
मंकीपॉक्सची लागण झालेल्या काही लोकांमध्ये ही दोन नवीन लक्षणं आढळून आली आहेत. ब्रिटनमध्ये 179 रुग्णांच्या चाचण्यांमध्ये झालेल्या काही रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळून आली आहेत.
कोरोनानंतर आता जगात मंकीपॉक्सनंही थैमान घातलं आहे. भारतातही मंकीपॉक्सची एन्ट्री झाली आहे. मंकीपॉक्सचे 18 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. एका अहवालात मंकीपॉक्स आजाराची दोन नवीन लक्षणं समोर आली आहेत. यामध्ये पहिलं लक्षणं रेक्टल म्हणजे गुदद्वारात दुखणं आणि दुसरं पेनाइल एडिमा असे दोन लक्षण समोर आले आहेत.