Health Tips : सांधेदुखी किंवा सांध्यांना सूज येणं याला याला वैद्यकीय भाषेत ‘आर्थरायटीस’ असं म्हटलं जातं. सोप्या किंवा सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, ‘आर्थरायटीस’ म्हणजे संधिवात. अर्थरायटिस हा एक असा आजार आहे ज्याने सूज, वेदनेसह शरीर आखडते. आपल्या हाडांना कमजोर करून शरीर कुरूप करणारा हा आजार असून, यामुळे सांध्यांमध्ये खूप वेदना होतात.
लसूण, ब्रोकोली आणि कोबी ठरेल उपयुक्त
जर रुग्णांनी नियमित खाण्या-पिण्यात काही पदार्थ व्यवस्थित घेतले तर या रोगात त्वरीत आराम मिळतो आणि वेदनाही कमी होतात. ब्रोकली आणि कोबी प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि क्रोमियमसारखे पौष्टिक तत्त्वे भरपूर असणारी ब्रोकली खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर सामान्य राहतो. (Health Tips) यातील फायटोकेमिकल्स आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव करतात. फूल कोबीमध्येही अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. जे आपली नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीला बळकट करतात.
प्रतिजैविके, जीवाणू प्रतिबंधक तसेच बुरशीजन्य प्रतिबंधक घटक शिवाय असतात. लसणात अनेक अँटी ऑक्सिडंट्स असतात जे शरीराला कर्करोग, अर्थरायटिस आदी गंभीर रोगांपासून वाचवते. अर्थरायटिस झालेल्यांनी तर रोज जेवणात लसणाच्या पाकळ्या अवश्य खाव्यात. (Health Tips) लसूण जेवण स्वादिष्ट करण्याबरोबरच आपल्याला जीवाणूंपासून वाचवतो. अर्थरायटिसच्या रुणांनी वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या व फळे नियमित खाल्ल्यास त्याचा फायदा होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : पावसाळ्यात ‘हे’ उपाय करा अन् मुलांना व्हायरल फिव्हरपासून दूर ठेवा
Health Tips : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल रोखेल दालचिनी
Health Tips : साठीनंतर आरोग्याकडे द्या लक्ष, करु नका दुर्लक्ष