Health Tips : अनेकजण मखाना फिटनेसकरता डायटमध्ये घेतात. यामध्ये भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम असते. मखाने हे चवीला कमी गोड असून यामध्ये शून्य कॅलरी असते. जाणून घ्या मखाना खाण्याचे फायदे -(Eat makhana to look younger, know other benefits of eating makhana)
तळलेल्या आणि चटपटीत पदार्थांना पर्याय
मखानामध्ये फायबर्स अधिक असतात. ज्यामुळे दिवसभर पोट भरल्यासारखे वाटतं. तळलेल्या आणि चटपटीत पदार्थांना टाळण्यासाठी मखाना हा एक उत्तम पर्याय आहे.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात
मखाना अँटिऑक्सिडेन्ट देखील आहे. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. (Health Tips) मखाना शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
शरीराचे योग्य पोषण होते
मखाना ग्लुटेन फ्री आहे. तसेच त्यात भरपूर प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीराचे योग्य पोषणही होते.
दाह किंवा उष्णतेचा त्रास कमी करते
यामध्ये अँटीबॅक्टरीअल गुणधर्म असतात. शरीरात दाह किंवा उष्णता जाणवत असल्यास मखानाचे सेवन अवश्य करावे.
अँटिएजिंग
मखानामध्ये अँटिएजिंग घटक असतात. मखानाच्या नियमित सेवनाने तुम्ही तरुण दिसू शकता.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
मखानामध्ये कॅलरीज आणि फॅट्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी मखाना अतिशय फायदेशीर आहे.
हाडांची वाढ आणि विकासासाठी उपयोगी
मखानामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, प्रोटिन्स, फॉफ्सरस, लोह, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडांची वाढ आणि विकासासाठी मखाना उपयोगी आहे.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
मखाना ह्रदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. कारण यामध्ये कोलेस्टेरॉल, सोडीयम, सॅच्युरेटेड फॅट्स अत्यल्प असतात. (Health Tips) तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ह्रदयाला पुरेसे ऑक्सिजन मिळते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : सतत एसीत बसणे आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या एसीमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम
Health Tips : जाणून घ्या ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याचे तोटे व केस गळती रोखण्यासाठी उपाय
Health Tips : ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने वजन करा कमी