Health Tips : आहारात फळे, पालेभाज्या असाव्यात असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून अनेकदा सांगितले जाते. त्याचे विशेष फायदेही आहेत. त्यात लालबुंद दिसणारे डाळिंब नुसते दिसायलाच नाही तर आरोग्यासाठीही फायद्याचे आहे. डाळिंबाचे इतके फायदे आहेत की त्याचे रोज सेवन केल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलसारखी संयुगे असतात जी मेंदूतील संरक्षणात्मक प्रभाव वाढवतात.
अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलसारखी संयुगे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी
डाळिंबात अनेक अँटिऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल असतात जे जळजळ कमी करून ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत करतात. दोन्ही संयुगे हृदयरोगापासून संरक्षण करण्यास देखील मदत करतात. डाळिंबाच्या रसानेही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. हे कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करते (Health Tips) आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य मजबूत करते आणि हृदयाशी संबंधित रोग टाळते. याच डाळिंबामुळे रक्तदाब, पचन आणि स्मरणशक्तीही सुधारते. डाळिंब रक्तातील लोहाची कमतरता पूर्ण करते आणि अॅनिमियासारख्या आजारांपासून आराम देते.
डाळिंबाच्या सेवनाने चेहऱ्यावर चमक येते. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलसारखी संयुगे असतात जी मेंदूतील संरक्षणात्मक प्रभाव वाढवतात.(Health Tips) डाळिंब उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर शरीरातील कोरडेपणा दूर करण्यातही ते खूपच फायदेशीर ठरते. या डाळिंबामध्ये विशेष घटकांव्यतिरिक्त, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील त्यात आढळतात. त्याचा फायदा आरोग्यासाठी होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास काय करावं? तर जाणून घ्या…
Health Tips : जास्त सडपातळ असणे घातकच; वाढू शकतो आजारांचा धोका