Health Tips : चहा हे जगभरातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. हे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे, यावर बराच काळ चर्चा होत आहे. काही अभ्यासकांचा असा विश्वास आहे की, कमी प्रमाणात चहा पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु, त्याचा अतिरेक अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यादेखील वाढवू शकतो.
लोहाची कमतरता आहे त्यांनी चहाचे सेवन कमी करावे
जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात चहा प्यायला तर त्यामुळे काळजी, चिंता, झोपेची समस्या आणि डोकेदुखी यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. चहामधील संयुगे शरीरातील काही पोषक घटकांच्या शोषणावर परिणाम करू शकतात, (Health Tips) त्यापैकी मुख्य लोह. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा धोका असतो. ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणासह अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांमध्ये आधीच लोहाची कमतरता आहे त्यांनी चहाचे सेवन कमी करावे.
चहामध्ये नैसर्गिकरित्या कॅफिन असल्याने, ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमचे झोपेचे चक्र विस्कळीत होऊ शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की, कॅफीन मेलाटोनिनचे उत्पादन रोखू शकते. परिणामी, झोपेची गुणवत्ता खराब होते. (Health Tips) मेलाटोनिन हा एक संप्रेरक आहे जो तुमच्या मेंदूला झोपण्याची वेळ असल्याचे संकेत देतो. अपुरी झोप हा विविध मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांशी निगडीत आहे.
चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या देखील होऊ लागते. संशोधनात असे दिसून आले आहे की, कॅफीन पोटात ऍसिडचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे ऍसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होऊ शकते. (Health Tips) ज्या लोकांना वारंवार छातीत जळजळ किंवा पोटाच्या समस्या असतात त्यांनी जास्त कॅफीन घेतल्यास लक्षणे बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे जास्त सातत्याने चहा पिण्याची सवय बदलावी असा सल्ला दिला जातो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास काय करावं? तर जाणून घ्या…
Health Tips : सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे
Health Tips : जास्त सडपातळ असणे घातकच; वाढू शकतो आजारांचा धोका