Health Tips : दालचिनीचा वापर रोजच्या आहारात केल्यास शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येण्यास मदत होते. दालचिनीचे आयुर्वेदात मोठे महत्व आहे. दालचिनी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. दालचिनीमध्ये आढळणारे सिनामल्डीहाइड आणि सिनामिक ॲसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
हृदयविकाराचा धोका कमी होतो
दालचिनीचे नियमित सेवन केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. ज्यामध्ये तुम्ही दालचिनीचा वापर चहामध्ये करू शकता. (Health Tips ) तसेच भाजी बनवताना देखील याचा वापर करता येऊ शकतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनी पावडर आणि गरम पाणी पिऊन तुम्ही शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणू शकता. मात्र, दालचिनीचे अतिसेवन तुमच्या आरोग्याचे नुकसानही करू शकते. सोबतच मध आणि दालचिनी तसेच दुधात दालचिनीची पावडर मिसळूनही तुम्ही पिऊ शकता.
जर तुम्ही असा आहार घेतला, ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असेल तर रक्तातील एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. मांस, दुग्धजन्य पदार्थ, (Health Tips ) अंडी, खोबरेल तेल, पाम तेल, लोणी, चॉकलेट, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि बेकरी प्रोडक्ट्स कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. त्यामुळे या गोष्टी टाळून तुम्ही स्वतःला खराब कोलेस्ट्रॉलपासून दूर ठेवू शकता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : साठीनंतर आरोग्याकडे द्या लक्ष, करु नका दुर्लक्ष
Health Tips : ब्लडप्रेशर नियंत्रणासाठी फायदेशीर आहे डार्क चॉकलेट
Health Tips : पित्तामुळे आहात त्रस्त? ‘हे’ घरगुती उपाय करा अन् आराम मिळवा