Pune News : पुणे : पूर्वीच्या प्रेमसंबंधांचा राग मनात धरून लग्न नाही केले तर आपले फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली तसेच दोघांचे फोटो कुटुंबीयांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार वडगाव शेरी परिसरात घडला आहे. Pune News

धवल धीरज उपाध्याय (वय २४, रा. चंद्रपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, धवल उपाध्याय याच्यासोबत महिलेचे पूर्वी प्रेमसंबंध होते. माझ्यासोबत लग्न कर असा धवलने महिलेकडे तगादा लावला होता. यावेळी महिलेने त्याला नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
तरीही तिने ऐकले नाही म्हणून तिच्या बहिणीला तसेच पती आणि वडिलांना फोन करून धमकी दिली. त्यांनंतर धवलने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून महिलेसोबतचे फोटो अपलोड केले.
दरम्यान, सदर फोटो महिलेच्या नातेवाइकांना पाठवून महिलेची बदनामी केली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत. Pune News







